MARATHI DEPARTMENT OBJECTIVES

■ मराठी भाषा, साहित्य, संस्कृती आणि विविध कलांचे वातावरण महाविद्यालयामध्ये निर्माण करणे.
■ विद्यार्थ्यांची श्रवण, वाचन, चिंतन, भाषण व लेखन कौशल्ये विकसीत करुन त्यांना सर्जनशील लेखनास उद्युक्त करणे.
■ विद्यार्थ्यांची नोकरी व व्यवसाय प्राप्तीसाठी भाषिक आणि प्रशासनिक कौशल्ये विकसीत करणे.
■ वृतपत्र, आकाशवाणी, दूरदर्शन या माध्यमांतर्गत नोकरी करण्यासाठी विद्यार्थ्यांची माध्यम कौशल्ये विकसीत करणे. विविध कार्यक्रम, चर्चासत्र, परिसंवाद, कार्यशाळा, प्रकल्प
■ अहवाल, ग्रंथ प्रदर्शन, साहित्य संमेलन आणि अभ्यास सहली मार्फत विद्यार्थ्यांच्या जाणिवा वृध्दिंगत करणे व विद्यार्थ्यांला अष्टपैलू बनविणे.
■ विद्यार्थ्यांना महाराष्ट्र लोक सेवा आयोग, एम. ए., एम. फिल., नेट-सेट परीक्षांचे मार्गदर्शन करणे.
■ विद्यार्थी विद्यापीठ गुणवत्ता यादीमध्ये येण्यासाठी विशेष उपक्रम-स्वयं अध्ययन, नमुना प्रश्नपत्रिका व उत्तर पत्रिका, प्रश्नपेढी, सराव परीक्षा आणि मार्गदर्शन.